Surprise Me!

पाकिस्तान मधे आहे महादेवाच्या अश्रू पासून बनलेले कुंड | Amazing News

2021-09-13 113 Dailymotion

धार्मिक स्थळांचे महत्व जगभरात आहे..काही प्राचीन तर काही अतिप्राचीन धार्मिक स्थळे त्यांच्या निर्मितीच्या कहाण्यां मुळे प्रसिद्ध असतात..काही मंदिरांचे निर्माण मनुष्यांनी केले आहे तर काही मंदिरे प्राचीन काळापासून स्थित आहेत. महादेवाचे असेच एक मंदिर पाकिस्तानात स्थित आहे. या मंदिराचे नाव आहे कटासराज मंदिर आहे . कटासराज शिव मंदिर 900 वर्ष जुने आहे..पाकिस्तानातील प्रांजाब प्रांतामधील चकवाल क्षेत्रामध्ये 910 वर्षांपूर्वीचे प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर श्रीकृष्णाने बांधल्याची आख्यायिका आहे.हे मंदिर महाभारत काळातही (त्रेतायुग) होते अशी मान्यता आहे. या मंदिराविषयी पांडवांशी संबंधित विविध कथा प्रसिद्ध आहेत. येथे एक तलाव पण आहे आणि तलावाशी संबधित एक मान्यता अशी आहे की, सतीने आत्मदहन केल्यानंतर महादेव सतीचे शव घेऊन भ्रमण करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुंचे दोन थेंब पडले.या अश्रुंपासून दोन कुंड तयार झाले. यामधील एक कुंड भारतातील पुष्कर क्षेत्रामध्ये ब्रह्म कुंड नावाने प्रसिद्ध आहे तर दुसरे कटासराज मंदिराजवळ आहे.या कुंडाचे पाणी दोन रंगाचे आहे. तलावाची खोली कमी असलेल्या पाण्याचा रंग हिरवा असून खोल ठिकाणावरील पाणी निळ्या रंगाचे आहे भारत-पाकिस्तान फाळणी काळात 1947 मध्ये हे मंदिर बंद करण्यात आले होते 2 जानेवारी 2014 रोजी या मंदिरात आरतीचे स्वर पुन्हा ऐकू आले होते. तेव्हापासून हे मंदिर खुले केले गेले आहे.पाकिस्तान सरकार या मंदिराची पुनर्स्थापना करून दोन हेतू साध्य करणाच्या विचारात आहे<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon